Sunday, August 30, 2026
Homeक्राईमAkole : अकोले पोलिसांनी विद्युत पंप चोरणारी टोळी पकडली

Akole : अकोले पोलिसांनी विद्युत पंप चोरणारी टोळी पकडली

3 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या विद्युत पंप, केबल, कॉपर व मोटारसायकल चोरणार्‍या टोळीस अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 7 गुन्ह्यांच्या तपासातून 3 लाख 17 हजार रुपयांचा चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत करत दोन अल्पवयीनसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आढळा विभागातील टाहाकारी, केळी-रुम्हणवाडी आणि मेहेंदुरी, रुंभोडी आदी भागात गेल्या डिसेंबर महिन्यापासून शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रिक मोटारीसाठी वापरण्यात येणारी केबल, तांब्याची तार व मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या.

याबाबत अकोले पोलिसांत काही तक्रार दाखल होत्या. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले बीट अंमलदार पोहेकॉ. मनोहर मोरे व खाडे यांनी विशेष तपास करत गुन्ह्यांची उकल केली.

त्यांना पोकॉ. सुहास गोरे, अविनाश गोडगे, सुनील नागरे, पोहेकॉ. दिघे, पोकॉ. काळे, पोकॉ. भालेराव यांच्या सहकार्याने श्याम शंकर मधे (वय 24, रा. पाडाळणे, ता. अकोले), किसन शिवाजी बर्डे (वय 19, रा. टाहाकारी, ता. अकोले), अमोल गोरख मेंगाळ (वय 20, रा. केळी-रुम्हणवाडी, ता. अकोले) व दोन अल्पवयीन मुले अशा पाच जणांची टोळी पकडली. त्यांच्याकडून मोटारसायकली (क्र.एमएच.17, बीयू.8677) व (एमएच.15, ईटी.0843), सात गुन्ह्यातील विद्युत मोटारी, केबल, तांब्याची तार आदींसह 3 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिंहस्थाची नांदी की प्रशासकीय अनागोंदी?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आयोजित केलेला ‘भक्ती संगम’ महोत्सव हा प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा, अनागोंदीचा आणि जनतेपासून तुटलेल्या...