Wednesday, September 9, 2026
HomeनगरPathardi : विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

Pathardi : विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील डमाळवाडी येथे शेताच्या बांधावर टाकलेल्या वीजवाहक केबलचा ट्रॅक्टरला स्पर्श होऊन पेरणी करणारे ज्ञानदेव रावसाहेब डमाळे (वय 38, रा. डमाळवाडी, ता. पाथर्डी) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे भाऊ बाबासाहेब रावसाहेब डमाळे यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र बाबासाहेब डमाळे, श्यामसुंदर बाबासाहेब डमाळे व चैतन्य रामचंद्र डमाळे (सर्व रा. डमाळवाडी, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्ञानदेव डमाळे हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असताना शेजारील शेताच्या बांधावर टाकलेल्या जिवंत वीजवाहक केबलचा ट्रॅक्टरला स्पर्श झाला. गंभीर जखमी झालेल्या डमाळे यांना अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फिर्यादीनुसार, संबंधितांनी शेताच्या बांधावर जिवंत वीजवाहक केबल टाकून ठेवली होती. या केबलमुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असूनही निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. याच निष्काळजीपणामुळे ज्ञानदेव डमाळे यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा मल्टीस्टेट फसवणूक : संचालक वैद्य अटकेत

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेटमधील सुमारे १५ कोटी ५२ लाख रूपयांच्या फसवणूक प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका संचालकाला...