Wednesday, September 30, 2026
Homeनगरविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सावळीविहीर |वार्ताहर| Savalivihir

राहाता तालुक्यातील शिंगवे येथील मिलिंद जनार्दन जाधव (वय 42) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याने ऐन पोळा सणाचे दिवशी शिंगवे गावावर शोककळा पसरली. मिलिंद जाधव हे शेतकरी कुटुंबातील असून नेहमीप्रमाणे पोळा सण असल्याने सकाळपासून गायी धुणं व रंगरंगोटी करण्याचे कामात व्यस्त होते.

- Advertisement -

त्यांनी मारुती व म्हसोबा मंदिरात जाऊन देवांना नारळ फोडले व पूजा अर्चा करून घरी गेले. घराचे पाठीमागे गेले असता पावसाची संततधार सुरू असल्याने पोलवरील विजेच्या तारेचा प्रवाहास त्यांचा संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील कुटुंबियांनी एकच आरडाओरडा केला. त्यांना ताबडतोब शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यास मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...