Friday, May 3, 2024
Homeनगरविजेसाठी निघोज येथे रास्ता रोको

विजेसाठी निघोज येथे रास्ता रोको

पारनेर (तालुका प्रतिनिधी) –

शुक्रवार दि. 26 रोजी निघोज, देविभोयरे, वडनेर व पठारवाडी ग्रामस्थांनी तीन तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर त्यांना यश आले

- Advertisement -

असून सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत निघोज वीज कार्यालयाचे उपअभियंता शेळके यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी निघोज-पारनेर रास्तारोको आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दीड वाजेपर्यंत सुरु होते.

आंदोलनकर्त्यांनी शेळके यांना वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगितले. आंदोलनकर्त्यांचा आक्रमकता पाहून शेळके यांनी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली. 1 वाजता नगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता ठाकूर हे या ठिकाणी आले. आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर चारही गावांतील शेतकर्‍यांनी विद्युत मोटारचे प्रत्येक कनेक्शन पाठीमागे 5 हजार रुपये तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. 5 मार्चपर्यंत शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमीतपणे सुरू ठेवण्याचा निर्णय अधिकारी व आंदोलक शेतकरी ग्रामस्थ यांच्या चर्चेतून घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, देवीभोयराचे सरपंच विठ्ठलराव सरडे, वडनेरचे सरपंच राहुल सुकाळे, निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, पठारवाडीचे माजी सरपंच भास्कर सुपेकर, माजी उपसरपंच शंकर पठारे, निघोज सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब लामखडे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, दिलीप ढवण, अर्जुन लामखडे, गणेश लंके, विकास शेटे, दत्तात्रय घोगरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, योगेश वाव्हळ, अस्लमभाई इनामदार, रावसाहेब वराळ, अनिल नर्हे, भरत ढवळे, किसन वराळ, अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे, निवृत्ती वरखडे, गणेश शेटे, सुभाष वरखडे, संदीप वराळ, शिवाजी ढवण, रमेश ढवळे, पोपट लंके, बजरंग वराळ, संजय लामखडे, विशाल जगदाळे, शिवाजी सुकाळे, चंद्रकांत लंके, लहू गागरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक निकम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या