मुंबई – घरगुती विजेच्या वापरात 5-7 टक्के, व्यावसायिक दरात 10-12 टक्के आणि औद्योगिक दरात 10-11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार असल्याचे वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे. नवे दर 1 एप्रिल 2020 पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणार्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.
उद्योगांना दिलासा
लॉकडाऊनमुळे राज्य सरकारने उद्योगांनाही दिलासा दिला आहे. सर्व उद्योग सध्या ठप्प असल्यामुळे पुढील तीन महिने कंपन्यांकडून वीज बिल वसुली केली जाणार नाही. यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अशी होणार कपात
(मुंबई वगळून)
घरगुती – 5 टक्के
व्यावसायिक – 10 – 11 टक्के
उद्योग – 11-12 टक्के
शेती – 1 टक्के




