Thursday, May 2, 2024
Homeनगरसाडे अकरा लाखांचे बांधकाम साहित्य चोरले

साडे अकरा लाखांचे बांधकाम साहित्य चोरले

अहमदनगर|Ahmedagar

बांधकाम सुरू असताना बांधकामाच्या ठिकाणी असलेले लोखंडी पत्रे, लोखंडी एंगल्स व इतर साहित्य असा 11 लाख 59 हजार 475 रूपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी दोघांविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सोन्याबापू कानडे (रा. कानडे मळा, सारसनगर), विनय वासुदेव सहगल (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लक्ष्मण निवृत्ती जाधव (वय- 40 रा. अकोळनेर ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सारसनगर मधील कानडे मळ्यात ही घटना घडली.

लक्ष्मण जाधव यांनी त्यांच्या सोहम रिअ‍ॅलिटी अँण्ड केशर डेव्हलपर्स जाईंट व्हेंचर फर्म द्वारे संतोष कानडे व विनय सहगल यांच्याकडून सारसनगर येथील कानडे मळ्यात सर्व्हे नं 116/1 व 116/2 च्या प्लॉट नं- 1 हा विकास करारनामा करून ताब्यात घेतला होता. सदर प्लॉटवर जाधव यांनी काम सुरू करून त्या ठिकाणी 11 लाख 59 हजार 475 रूपये किंमतीचे लोखंडी पत्रे, लोखंडी एंगल्स टाकले होते. यानंतर संतोष कानडे व विनय सहगल यांनी मजुर लावुन सदर लोखंडी पत्रे व एंगल्सची चोरी केली असल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या