Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअकरा वर्षीय मुलगा बेपत्ता; अपहरणाचा संशय

अकरा वर्षीय मुलगा बेपत्ता; अपहरणाचा संशय



मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

तालुक्यातील निमगाव शिवारातून अनोळखी व्यक्तीने अकरा वर्षीय मुलास फूस लाऊन पळवून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालीआहे. मुलाच्या अपहरणाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

देविदास हरिदास कुणगर (३१, रा. निमगाव) हे मेंढी पालन व्यवसाय करीत असून त्यांचा निमगाव शिवारात वाडा आहे. याच वाड्यावर त्यांच्या समवेत वास्तव्यास असलेला त्यांचा भाचा वेदांत मनोज महाजन (११} हा गेल्या मंगळवार पासून बेपत्ता आहे. कुणगर यांनी त्याचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.त्याचे अपहरण झाले असल्याचा संशय व्यक्त करीत कुणगर यांनी या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात संशयिता विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वेदांत ४ फूट ५ इंच उंचीचा असून निमगोरा आहे. त्याने अंगात चॉकलेटी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची फूल पॅन्ट परिधान केली आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास संबंधितांनी तालुका पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन तपास अधिकारी डी.पी. काळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या