Friday, May 3, 2024
Homeनाशिकमाणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी महिलांना रोजगार

माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी महिलांना रोजगार

नाशिक । Nashik

माणदेशी फाउंडेशन तर्फे पेठ तालुक्यातील अनेक गावातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात माणदेशी फाऊंडेशन ने पुढाकार घेतला असून मार्गदर्शक म्हणून एक महिलांना आपली नोकरी व्यवसाय सोडून महिलांना व्यावसायिक शिक्षण देत आहे.

- Advertisement -

माणदेशी फाउंडेशन च्या फिल्ड ऑफिसर म्हणून सौ. सुनंदा भुसारे या महिलेचे नाव असून त्यांनी पेठ तालुक्यातील काही दुर्गम खेड्यात जाऊन अनेकांना रोजगार प्रशिक्षण देऊ केले आहे.

आत्तापर्यंत त्यांनी आड बु., आसरबारी, गायधोंड, झरी, सावर्ना, बेहडापाडा इ. गावातील महिलांना शेळीपालन, कुकूटपालन, मशरूम उद्योग असे अनेक छोटया छोटया उधोजकचे महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना व्यावसायिक बनविल्या आहेत.

पेठ तालुक्यातील आड बु. गावातील ९०० पेक्षा अधिक महिलांना मशरूम व्यवसाय प्रशिक्षण देऊन बियाणं वाटप केले. एक ते दीड हजार रुपये गुंतवणूक करून महिलांनी दहा हजाराचे उत्त्पन्न महिलांनी मिळविले आहे.

त्यामुळे महिलां घर सांभाळून आपण सुद्धा मशरूम व्यवसायातून पैसे कमविल्याने त्यांना आनंद होत होत आहे. महिला सुद्धा एक पाऊल मागे नाही असेच माणदेशी फाउंडेशन च्या माध्यमातून पुढे पाऊल टाकत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या