Saturday, September 12, 2026
Homeक्राईमCrime News : राहुरी फॅक्टरी येथील अभियंत्याची 21 लाखांची फसवणूक

Crime News : राहुरी फॅक्टरी येथील अभियंत्याची 21 लाखांची फसवणूक

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगला पैसे लावल्यास त्यातून जास्त पैसे मिळतात. 20 लाख दिल्यास त्याचे महिन्याला 1 लाख देतो, असे आमिष दाखवून भामट्याने एका अभियंत्याची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. अजिंक्य किरण चव्हाण (वय 30) धंदा इंजिनियर रा. आदीनाथ हौसिंग सोसायटी, राहुरी फॅक्टरी, यांची राहुरी फॅक्टरी येथील डॉ. हर्षद चोरडीया यांच्या मार्फत आरोपी बरोबर 2023 मध्ये ओळख झाली होती. आरोपीचे राहुरी फॅक्टरी येथे ड्रायक्लीनचे दुकान असून तो शेअर मार्केट ट्रेडींग करतो, ट्रेडिंगला पैसे दिल्यास तो महिन्याला 5 टक्के रुपये परत देतो, असे डॉ. चोरडीया यांनी सांगीतले होते. त्यामुळे डॉ. हर्षद चोरडीया यांचे सांगणेवरुन अजिंक्य चव्हाण यांनी आरोपीवर विश्वास ठेवला.

- Advertisement -

अजिंक्य चव्हाण यांना पैशाची अडचण असल्याचे त्यांनी डॉ. चोरडीया यांना सांगीतले. तेव्हा डॉ. चोरडीया यांनी पुन्हा अजिंक्य चव्हाण यांची आरोपी बरोबर मिटींग करुन दिली. त्यावेळी डॉ. चोरडीया यांनी आरोपीला सांगीतले की, अजिंक्य चव्हाण यांना घराचे हप्ते भरुन लोण सेटलमेंट करावयाचे आहे, त्याला काही मदत कर, असे सांगीतले. तेव्हा आरोपी अजिंक्य चव्हाण यांना म्हणाला की, तुम्ही मला 20 लाख रुपये द्या. मी तुमचे पैसे शेअर मार्केट ट्रेडींगला माझ्या नावावर लावतो. त्यातून आपल्याला महिन्याला चांगले पैसे मिळतात. त्यामुळे मी तुम्हाला महिन्याला 5 टक्के व्याज एक लाख रुपये देईल, असे म्हणाला. त्यानंतर अजिंक्य चव्हाण यांनी विविध फायनान्स कंपनीमध्ये कर्ज काढून वेळोवेळी आरोपीच्या अकाउंटवर ऑनलाईन 21 लाख 3 हजार रुपये टाकले. त्यानंतर दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी हे आरोपीच्या लॉन्ड्री दुकानावर भेटण्यासाठी गेले असता तो भेटला नाही. घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला, तो त्याचा मोबाईल बंद करुन पसार झाला होता.

त्यानंतर दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी अजिंक्य चव्हाण यांना राहुरी फॅक्टरी येथील लोकांकडुन समजले की, आरोपी हा राहुरी तालुक्यातील व इतर बाहेरील लोकांकडुन शेअर मार्केट ट्रेडींगला पैसे टाकून जास्त पैसे मिळवुन देतो. असा लोकांचा विश्वास संपादन करून जास्त पैशाचे आमीष दाखवून लोकांकडुन पैसे घेऊन फसवणूक करुन त्याची आई, पत्नी, मुलगी यांचेसह राहुरी तालुक्यातून कोठेतरी पळुन गेला आहे. त्यानंतर अजिंक्य किरण चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी संतोष विनायक भोसले, रा. चिंचविहीरे, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. 1020 भारतीय दंड संहिता कलम 420, 406 प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...