Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSamantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू झाली आई; पती राज...

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू झाली आई; पती राज निदिमोरूसोबत केले चिमुकल्याचे स्वागत

मुलाचे नावही केले जाहीर

मुंबई | Mumbai

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि तिचा पती, प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. समंथाने गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) गोंडस मुलाला जन्म दिला असून, शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे नाव ‘देव निदिमोरू’ असे ठेवले आहे.

- Advertisement -

समंथाने इन्स्टाग्रामवर (Instagram) नवजात बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने “आमचा गोंडस मुलगा (Our beautiful baby boy)” असे कॅप्शन देत बाळाचे नाव आणि जन्मतारीख (१९.११.२०२६) नमूद केली आहे. “आमच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टनंतर मनोरंजनविश्वातील कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लग्न ते पालकत्वाचा प्रवास

समंथा आणि राज निदिमोरू यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोईम्बतूरमधील ईशा योग केंद्रात कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने विवाह केला होता. ‘द फॅमिली मॅन २’ आणि ‘सिटाडेल : हनी बनी’ या वेबमालिकांमध्ये एकत्र काम करताना दोघांमधील जवळीक वाढली होती. राज निदिमोरू हे ‘राज आणि डीके’ या प्रसिद्ध दिग्दर्शक जोडीतील असून ‘फर्जी’ आणि ‘गन्स अँड गुलाब्स’ या मालिकांमुळे ते ओळखले जातात.

गरोदरपणाचा प्रवासही शेअर केला

सुरुवातीला ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका बी. व्ही. नंदिनी रेड्डी यांनी समंथाच्या गरोदरपणाचे संकेत दिले होते. त्यानंतर एका परिषदेत समंथाने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला होता. गरोदरपणाच्या काळात तिने फिटनेस आणि व्यायामाचे व्हिडीओ (Video) शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला होता. बाळाच्या आगमनापूर्वी दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठांच्या उपस्थितीत घरी विशेष पूजेचेही आयोजन करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पंचवटीत भरदुपारी युवकाला संपवलं; मुलीवरून वाद झाल्याचा...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati टकलेनगर परिसरात आज (शुक्रवार दि. २०) रोजी भरदुपारी एका महाविद्यालयीन युवकाची हत्या (Youth Killed) करण्यात आली. वेदांत संतोष काळे (१८)...