Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : उद्योजकाला 13 लाख 56 हजार ऑनलाईन गंडा

Crime News : उद्योजकाला 13 लाख 56 हजार ऑनलाईन गंडा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील एका उद्योजकाची कंपनीचा अधिकृत ई-मेल आयडी हॅक करून बनावट लेटरहेड, बनावट धनादेश आणि खोटे बँक तपशील तयार करत तब्बल 13 लाख 56 हजार 957 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी व संबंधित कॅनरा बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संदीप मोरे (वय 52, रा. श्रीकृष्ण नगर, सागर हॉटेलसमोर, पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. ते दुर्गा पॉलिथर्म कंपनीचे व्यावसायिक आहेत. 17 जून ते 21 जुलै 2026 या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कंपनीचा अधिकृत ई-मेल आयडी हॅक केला. त्यानंतर आरोपीने कंपनीच्या लेटरहेडची हुबेहूब बनावट प्रत तयार केली. तसेच कंपनीचे बँक खाते बदलल्याचा भास निर्माण करून कॅनरा बँकेचे खाते क्रमांक नमूद असलेला बनावट चेक आणि नवीन बँक तपशील तयार केले.

हे बनावट कागदपत्र कंपनीचे ग्राहक सीजी पॉवर अँड सोल्युशन्स लिमिटेड यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले. त्यानुसार ग्राहक कंपनीने दुर्गा पॉलिथर्मला देय असलेली रक्कम आरोपीने दिलेल्या बनावट बँक खात्यावर वर्ग केली. त्यामध्ये 9 जुलै रोजी 6 लाख 93 हजार 223 रुपये आणि 21 जुलै रोजी 6 लाख 63 हजार 734 रुपये, अशी एकूण 13 लाख 56 हजार 957 रुपये आरोपीच्या खात्यावर जमा झाले. ही रक्कम दुर्गा पॉलिथर्म कंपनीच्या बँक ऑफ बडोदा येथील अधिकृत खात्यात जमा न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...