Friday, September 20, 2024
Homeनगरगुप्तधनासाठी जुन्या वाड्यात खोदकाम

गुप्तधनासाठी जुन्या वाड्यात खोदकाम

श्रीगोंदा | प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एक तीनशे वर्ष जुन्या वाड्यात अज्ञान व्यक्तींनी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे उघड झाले.

स्थानिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यावर हे खोदकाम करणारे पळून गेले. गुप्तधन काढण्यासाठी वाड्यातील खोदकामाच्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा शहर तसे पुरातन आहे. इथे ऐतिहासिक संदर्भ असल्याने शहरात अनेक जुने वाडे आहेत. धनिक व्यक्ती, तत्कालीन सैन्यातील सरदार यांचे चिरेबंदी वाडे शहरात आहेत. काळाच्या ओघात हे वाडे बंद अवस्थेत आहेत.

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या भग्न वाड्यात कुणाचीही वर्दळ नसल्याचा फायदा घेत काही अज्ञान व्यक्ती वाड्यातील देवघराच्या बाजूंने खोदकाम करत होते. मात्र स्थानिकांकडून विचरणा झाल्यावर खोदकाम करणारे पळून गेले असल्याचे दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी सांगितले आहे. या ठिकाणी खोदकाम करण्यापूर्वी हळद, कुंकू, गुलाल,अगरबत्ती लावून पूजा केल्याचे देखील दिसून आले. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या