Wednesday, April 1, 2026
Homeक्राईमNewasa : खोटी बनावट कागदपत्रे बनवून 21 एकर जमीन नावे केली

Newasa : खोटी बनावट कागदपत्रे बनवून 21 एकर जमीन नावे केली

दोघा सेतूचालकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे खोट्या वारसनोंदी लावून जमीन नावे करुन फसवणूक केल्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोजेस संजय जाधव रा. नेवासा खुर्द यांच्या फिर्यादीवरुन सचिन रतन धोंगडे (रा.नेवासा बुद्रुक) संदीप आप्पासाहेब मुठे (मुठेवाडगाव ता. श्रीरामपूर), शरद पिटर जाधव (नेवासा बुद्रुक), प्रमिला सचिन भोसले (पिंपरी चिंचवड), संजय विष्णू भगत (साईनाथनगर ता. नेवासा) व मिना सतिश जाधव (रा. आरडगाव ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीत म्हटले की, आमची नेवासा बुद्रुक शिवारात वडिलोपार्जीत 21 एकर 17 गुंठे इतकी शेतजमीन आहे. सदरची शेती माझे पंजोबा केरु भगवंता जाधव (मयत) यांचे नावावर आहे. माझे आजोबा व चुलत आजोबा कामानिमित्त बाहेरगावी राहावयास होते. माझे वडील संजय मधुकर जाधव (मयत) हेही कामानिमित्त बाहेरगावी होते. आम्ही सर्व बाहेरगावी राहत असल्यामुळे सदर जमिनीची वारस नोंद घेण्याचे राहिले होते. फेब्रुवारी 2026 मध्ये ऑनलाईन अ‍ॅपद्वारे मोबाईलमध्ये आमचे शेत गट उतारा तपासला असता आमच्या शेती गट क्रमांकावर शरद पिटर जाधव, प्रमिला भोसले यांची नावे दिसली.

तेव्हा तलाठी कार्यालय येथे चौकशी केली व ई फेरफार नुसार कागदपत्रे पाहिली असता नेवासा बुद्रुक येथील सचिन रतन धोंगडे व संदीप आप्पासाहेब मुठे (मुठेवाडगाव ता. श्रीरामपूर हल्ली नेवासा तहसीलसमोर सेतूचालक) यांनी संगनमत करुन खोटे वारस प्रतिज्ञापत्र बनवून खोटे वारस दाखले केल्याबाबत लक्षात आले. यात 6 जणांची खोटे बनावट मृत्यू प्रमाणपत्रे दाखल केली होती. तसेच बनावट वारसा दाखल व वारस नोंद प्रतिज्ञापत्र केल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीसह सर्व कार्यालयांनी ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. सरपंच, पोलीस पाटील सोसायटी चेअरमन यांच्या सह्या व शिक्के बनावट तयार करुन वारस दाखले बनविले.

दुय्यम निबंधकांसमोर दोन खोटे वारसदार शरद पिटर जाधव व प्रमिला सचिन भोसले यांना उभे करुन खरेदी खत केले. साक्षीदार म्हणून सेतूचालक सचिन धोंगडे व संदीप मुठे यांच्या सह्या आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन नावावर करुन घेतली. या फिर्यादीवरुन वरील 6 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 318(4) प्रमाणे नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे करत आहेत.

ताज्या बातम्या

सिलेंडरच्या

LPG Price Hike: आधीच टंचाईच्या झळा, त्यात महागाईचा भडका; महिन्याच्या पहिल्याच...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे देशात आधीच इंधन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती असताना, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. १ एप्रिल...