Tuesday, May 5, 2026
HomeनाशिकAshok Kharat Wife Kalpana Kharat : वयात मोठं अंतर, लग्नानंतर सुनीताची झाली 'कल्पना; भोंदू...

Ashok Kharat Wife Kalpana Kharat : वयात मोठं अंतर, लग्नानंतर सुनीताची झाली ‘कल्पना; भोंदू अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू ऐकून व्हाल चकित

नाशिक | Nashik

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी एसआयटीकडून (SIT) त्याची कसून चौकशी सुरु असून, आज बुधवारी (दि.०१) रोजी त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरात चौकशीत सहकार्य करत नसल्याचे म्हणत काल (मंगळवारी) रात्री एसआयटीकडून त्याचा मुलगा हर्षवर्धन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्याच्या पत्नीला अटक करण्यासाठी एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले. पंरतु, त्याआधीच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली.

- Advertisement -

यानंतर आता ऐशोआरामी जीवन जगणारी भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना (पूर्वाश्रमीची सुनीता) खरात हिच्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातची पत्नी कल्पना हिचे माहेर सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पाडळी हे गाव असून, याठिकाणी आजही तिचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या कुटुंबावर अलीकडच्या काळात दु:खाचा डोंगर कोसळला. कल्पनाच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांचेही आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे घरात वृद्ध आई, भाऊजयी आणि लहान भाचा असेच कुटुंब उरले आहे.

दरम्यान, अशोक खरातशी लग्न (Marriage) झाल्यानंतर माहेरी गरिबी असणार्‍या कल्पनाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. मात्र त्यानंतर माहेरशी तिचे संबंध हळूहळू तुटत गेले. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, कल्पना क्वचितच वृद्ध आई, विधवा भावजयी आणि भाच्याला भेटण्यासाठीही पाडळी गावात येत होती. तर तिचा लहान भाऊ खरात कुटुंबीयांच्या संपर्कात असून, सिन्नर-शिर्डी महामार्गावर तो एका हार्डवेअरच्या दुकानाचा कारभार बघतो. तसेच तिचा दुसरा भाऊ नाशिक येथे वास्तव्यास असल्याचे बोलले जाते.

अशोक खरातचे लग्न झाले उशिरा

भोंदू अशोक खरातचे वय वाढल्याने त्याचे लग्न जमत नव्हते. अशावेळी एका नातेवाइकामार्फत कल्पनाशी त्याचा विवाह जुळवून आणण्यात आला. वयात मोठे अंतर असल्याने लग्नाचा सर्व खर्च खरात कुटुंबियांनी करण्याची दर्शवल्याने वडि‍लांनी तिचे लग्न खरातशी लावून दिल्याची माहिती आहे.

खरातचा मुलगा आणि मुलीला तपासासाठी घेतले ताब्यात

अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याने काल (मंगळवारी) रात्री एसआयटीने खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी तृप्ताबाला यांना तपासासाठी ताब्यात घेतले. त्यामुळे आता त्याच्यासमोर मुलांची चौकशी होणार आहे. तर फरार असलेल्या कल्पनाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ मे २०२६ – लोकशाहीचा वेधक कौल

0
भारतीय लोकशाहीच्या महाकुंभातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल केवळ सत्तांतराचे आकडे नाहीत, तर ते बदलत्या भारताच्या राजकीय मानसिकतेचे प्रतिबिंब...