Saturday, June 13, 2026
Homeक्राईमCrime News : तोतया पोलीस अधिकार्‍याकडून पाच लाखांच्या खंडणीची मागणी

Crime News : तोतया पोलीस अधिकार्‍याकडून पाच लाखांच्या खंडणीची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत 5 लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या अज्ञात भामट्यांविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनीत नानासाहेब जाधव (वय 38, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी विनीत जाधव यांना 29 जुलै 2025 ते 30 जानेवारी 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन येत होते.

- Advertisement -

समोरून बोलणार्‍या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा खोटा गुन्हा टाळण्यासाठी संशयित आरोपींनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या जाधव यांनी अखेर सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तींसह त्यांच्या इतर अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...