Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमCrime News : पोलीस असल्याची बतावणी करून साडेतीन तोळे लांबविले

Crime News : पोलीस असल्याची बतावणी करून साडेतीन तोळे लांबविले

सावेडीत वृध्दाची फसवणूक || दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून दोन चोरट्यांनी वृध्दाकडील सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी (6 जून) सायंकाळी घडली. याप्रकरणी रविवारी (7 जून) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपतराव विष्णू पंदारे (वय 84, रा. तुळजाभवानी मंदिरासमोर, अष्टविनायक कॉलनी, पाईपलाईन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी गणपतराव पंदारे नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते अष्टविनायक कॉलनीच्या कमानीजवळ पायी जात असताना त्यांच्या मागून दोन अनोळखी इसम आले. सदर इसमांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत, तुमच्या गळ्यातील चैन आणि हातातील अंगठ्या काढून द्या, असे सांगितले. समोरचे व्यक्ती पोलीस असल्याचा विश्वास बसल्याने पंदारे यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची सोन्याची चैन आणि हातातील दोन तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या.

यानंतर त्या इसमांनी त्यांच्या हातातील अंगठ्या पंदारे यांच्या हातात देत दिशाभूल केली. त्यानंतर गणेश बुक एजन्सीसमोर उभी केलेल्या दुचाकीवर बसून दोघेही भिस्तबाग चौकाच्या दिशेने पसार झाले. काही वेळानंतर त्या इसमांनी दिलेल्या अंगठ्या बनावट असल्याचे आणि त्यांना दिलेली चैन परत दिली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे पंदारे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कॉलनीतील महिलेने त्यांच्या मुलाला घटनेची माहिती दिली. दुसर्‍या दिवशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सावध राहण्याचे आवाहन
शहरात वृध्द नागरिकांना लक्ष्य करून पोलीस असल्याची बतावणी करत दागिने काढून घेण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन अहिल्यानगर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...