Friday, May 3, 2024
Homeनाशिकमदतनीसच्या अर्जासाठी तयार केला बनावट ठराव

मदतनीसच्या अर्जासाठी तयार केला बनावट ठराव

हरसूल । Harsul

राजकारणात गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत सावळा गोंधळ पहायला मिळतो. हेच चित्र आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही दिसून येते. अशाच एका बहाद्दराने डुप्लिकेट सही शिक्के बनवून ठराव तयार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

ही घटना पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावंध ग्रामपंचायतीतील पळशी बु। येथे घडली आहे. येथील उपसरपंचाने ग्रामसभा व मासिक ठराव हा बनावट सही शिक्क्यानिशी तयार केल्याचे आढळून आले आहे. सदर बाब इतर सदस्यांनी व ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहे. झाले असे कि तालुक्यातील कुळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पळशी बु।:या उप केंद्रामध्ये अर्ध वेळ स्त्री सेविका (मदतनीस) या जागेसाठी गावातील एकूण सहा महिलांनी अर्ज दाखल केले होते.

परंतु कुळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामस्थांना सूचना देऊन ग्रामसभा किंवा मासिक मिटींग यावर एकच नावाचा ठराव करून अनुभवी व हुशार महिलेची निवड करावी, ही सूचना ग्रामस्थांना दिली. त्यानुसार ग्रामस्थांनी देखील यास मान्यता दिली.

परंतु उपसरपंच म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रभागा धनराज ठाकरे यांनी सर्वांना अर्जदार असलेल्या या पाच महिलांना डावलून कुठल्या प्रकारची ग्रामसभा, अथवा मासिक मिटींग न घेता परस्पर खोटा ठराव करून व त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या करून प्राथमिक आरोग्य केंद्र कुळवंडी या ठिकाणी वैधकीय अधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज साजर केला.

संबंधित अधिकारी यांनी सदर अर्जावर शेरा मारून तो तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती पेठ यांच्याकडे पाठवला होता. परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही बाब लक्षात आल्याने त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान दिलेली तारीख ही चुकीची असल्याचे तसेच या दिवशी कोणतीही ग्रामसभा अथवा मासिक झाली नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

विशेष म्हणजे या ठरावावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह शिक्क्यानिशी ठराव दिलेला होता. परंतु याबाबत कोणालाही कल्पना नसल्याने सर्वच अवाक्या झाले. सदर प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी ग्रामस्थांनी मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती पेठ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या