नाशिक | Nashik
जिल्ह्यातील ग्रामीण भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहतांना पाहायला मिळत आहे. तसेच ग्रामीण भागातील काही ठिकाणी धुव्वाधार पाऊस झाल्याने अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे. तर अनेक भागांत मंदिरे, पुल, रस्ते आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले
अशातच आता जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) चांदोरी (Chandori) येथील गोदावरी नदीने (Godavari River) धोक्याची पातळी ओलांडल्याने गावातील प्रसिद्ध खंडेराव मंदिरासह हेगडी प्रधान मंदिरे आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेले आहे.
हे देखील वाचा : पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग
चांदोरी येथील गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदी पात्रातील मंदिरांसह शेजारील खंडेराव मंदिर, हेगडी प्रधान मंदिर स्मशानभूमी आदी पाण्यामध्ये गेले आहे. तर गोदावरी नदीच्या कडेला असलेल्या चांदोरी,सायखेडा आणि करंजवन या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस
तर दुसरीकडे सिन्नर तालुक्याची (Sinnar Taluka) जीवनवाहिनी असलेली देवनदी (Devnadi) देखील प्रवाहित झाल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या (Farmer) आशा पल्लवीत झाल्या आहेत. आज रविवारी पहाटे सिन्नर-शिर्डी हायवे (आम्रपाली हॉटेल जवळ) खोपडी बुद्रुक येथील बंधारा भरल्याने पाणी देवपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत देवपूर येथे हे पाणी पोहोचेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा