Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग

पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग

- Advertisement -

ओझे l विलास ढाकणे Oze

दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसां पासून दमदार पावसाने हजरी लावल्याने तालुक्यातील धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे सतत पडणा-या पावसामुळे आज तालुक्यातील पालखेड धरण ८०% भरले असून धरणातून कादवा नदीत २३४३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरात मध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मांजरपाडा( देवासाने) प्रकल्पातून पाणी येण्यास सुरवात झाली असून तसेच पुणेगाव धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरणात आज सांयकाळी पाच वाजेपर्यत ४८% इतका पाणीसाठा झाला असून तिकडे वाघाड धरणात क्षेत्रातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे वाघाड धरणही ४८% भरले आहे.

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या करंजवण धरणातील पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात पाणी साठण्यास होण्यास सुरुवात झाली असून करंजवण धरणाचा पाणीसाठा आज सांयकाळ पर्यत ३०% पर्यंत पोहचला आहे. त्याच प्रमाणे ओझरखेंड व तीसगाव धरणातही पाणी साठण्यास सुरवात झाली असली तरी हे दोन्ही धरणे मृतसाठ्यात आहे.विशेष म्हणजे तालुक्यात पडणा-या पावसाची परिस्थिती काही दिवस आशीच राहिल्यास तालुक्यातील सर्वच धरण साठ्यामध्ये समाधानकारक शक्यता निर्माण झाली आहे.

आज पालखेड धरणातून कादवा नदीत पाण्याचा विसंर्ग सोडण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आव्हान तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या