Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुप्रसिध्द कवी, हास्यसम्राट 'मिर्झा एक्स्प्रेस' फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच...

सुप्रसिध्द कवी, हास्यसम्राट ‘मिर्झा एक्स्प्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच निधन

अमरावती | Amravati
महाराष्ट्राच्या कविविश्वात विनोदी काव्यसादरीकरणाची वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज (शुक्रवार, 28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. दुपारनंतर अमरावतीमधल्या ईदगा कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे.

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५७ रोजी झाला होता. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. तर १९७० पासून त्यांनी कविता सादर करायला सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही केलेय. कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक समस्या, राजकीय विरोधाभास यांसारख्या विषयांवर ते नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करायचे. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व होते.

- Advertisement -

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज – माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव. सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या घरात वास्तव्यास होते.त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, आणि दोन सुसंस्कृत कन्या महाजबी व हुमा असा परिवार आहे.

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भ-मराठवाडा परिसरात कविसंमेलनांचे आकर्षणबिंदू होते. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले होते. त्यांच्या सादरीकरणाची खुमासदार भाषा, तुफानी विनोद, ग्रामीण बोलीतील पोट धरून हसवणारे किस्से, आणि सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारी शैली त्यांची खास ओळख होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

उमराणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक

0
उमराणे | वार्ताहर Umrane येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग सहा दिवसांच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाल्याने गत दोन दिवसापासून विक्रमी...