Thursday, June 4, 2026
Homeदेश विदेशCrime News : धक्कादायक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार; तब्बल दोन तास...

Crime News : धक्कादायक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार; तब्बल दोन तास फिरवलं, मग…

फरीदाबाद । Faridabad

हरयाणामधील फरीदाबाद शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय विवाहित महिलेला घरी सोडण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी धावत्या कारमध्ये तिच्यावर तब्बल दोन तास सामूहिक अत्याचार केला. या अमानवीय कृत्यानंतर पीडितेला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर फेकून देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री घडली. पीडित महिला रात्री घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला घरी सुरक्षित सोडण्याचे आश्वासन दिले आणि गाडीत बसवले. मात्र, गाडी घरी नेण्याऐवजी आरोपींनी ती गुरुग्राम रोडच्या दिशेने सुसाट वेगाने नेली. धावत्या कारमध्येच दोघांनी पीडितेवर अमानवीय अत्याचार केले.

मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेला एसजीएम नगर येथील राजा चौक परिसरात कारमधून खाली फेकून दिले. या हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. जखमी अवस्थेतही पीडितेने आपल्या बहिणीशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात पीडितेवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून तिच्या चेहऱ्यावर डॉक्टरांना १० ते १२ टाके घालावे लागले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी, या भीषण अनुभवामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. पीडितेच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळ आधी पीडितेचे आईशी भांडण झाले होते, त्यानंतर ती मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. कौटुंबिक वादामुळे ती सध्या पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवली. पीडितेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासाच्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली व्हॅनही जप्त करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील ९ महिन्यांपासून फरार मुख्य...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati  फुलेनगर परिसरातील मुंजाबा चौकात झालेल्या दोन गटांतील दगडफेक आणि गोळीबार प्रकरणातील (Firing Case) मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात पंचवटी पोलिसांच्या...