Thursday, March 13, 2025
Homeक्राईमबांधाच्या कारणावरून तरुणाची हत्या

बांधाच्या कारणावरून तरुणाची हत्या

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी एका तरुणाला काठीने जबर मारहाण करून त्याला ठार केले. ही घटना वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचडगाव येथे रस्त्याच्या कडेला समाज मंदिरासमोर सोमवारी रात्री उघडकीस आली. सुनील कडुबा वाघ (रा. चिंचडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेतातील बांधाच्या कारणावरून चिंचडगाव येथील विजय पुंजाहरी वाघ व पोपट उर्फ भावड्या लहानु वाघ या दोघांनी सुनील वाघ यास काठीने मारहाण केली. या घटनेत सुनील वाघ यास जबर मार लागल्याने तोंडातून रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला अशी तक्रार सुनील वाघ याचे मेहुणे हिंमत नारायण भोसले (रा. भामाठाण, तालुका श्रीरामपूर) यांनी पोलिसांत दिली.

- Advertisement -

यावरुन दोघांविरुद्ध पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील वाघ हा चिंचडगाव येथे एकटाच राहत होता. त्याचे विजय वाघ व पोपट वाघ या दोघांसोबत शेतातील बांधाच्या कारणावरुन नेहमी भांडणे होत असे. यापूर्वी नातेवाईक व मध्यस्थांची दोघांमधील वाद मिटवला होता. परंतु, यावेळीही त्याच कारणावरुन भांडण झाले व त्याचे पर्यावसन खुनात झाले. रात्री दहा वाजेच्या सुमारास समाज मंदिरासमोर सुनिल वाघ पडला असून त्याला मार लागला आहे. तसेच त्याची हालचाल होत नसल्याची माहिती गावचे सरपंच शरद बोरनारे यांनी हिंमत भोसले यांना कळवली.

त्यानंतर भोसले यांनी घटनास्थळी येऊन सुनील वाघ यांना तातडीने वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुनील वाघ यास तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी शिरगाव पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...