Monday, May 20, 2024
Homeजळगावमांडळ शिवारात वीज पडून शेतमजूर ठार , चार जखमी

मांडळ शिवारात वीज पडून शेतमजूर ठार , चार जखमी

अमळनेर Amalner प्रतिनिधी

मांडळ (ता. अमळनेर) (Mandal Shiwar)  शिवारात दुपारी ४ वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain with thunder) झाला. त्यात आकाशातून वीज (lightning strike) पडून शेतात काम करायला गेलेल्या ३५ वर्षीय शेतमजूराचा (Farm laborer) जागीच मृत्यू (killed) झाला असून सोबत काम करणारी सासू ,पत्नी व दोन्ही मुले जखमी (injured) झालेल्या अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

 मांडळ शिवारातील भगवान नथु पारधी यांच्या शेतात भुईमूग उपटायला गेलेल्या परिवारावर वीज पडून काळाने झडप घातली . त्यात आनंदा सुरेश कोळी वय ३५ हा पाऊस पडत असताना व विजेच्या कडकडाट सुरू झाल्याने निंबाच्या झाडाखाली आश्रयाला आला असता आकाशातून वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्या जवळ असलेल्या सासू लटकनबाई आसाराम कोळी (वय ६०) , पत्नी प्रतिभा आनंदा कोळी (वय ३०) , मुलगा राज आनंदा कोळी (वय ९) प्रशांत आनंदा कोळी (वय ७) हे जखमी झाले असून त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी गावात आणून पुढील उपचारासाठी खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे .

घटनास्थळी हवालदार भरत श्रीराम इसी , भरत गायकवाड व तुषार वाघ यांनी पंचनामा करून मयत आनंदा सुरेश कोळी यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा त्याचे शवविच्छेदन होउन गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भरत श्रीराम इसी हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या