Friday, May 3, 2024
Homeनाशिकवीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सिन्नर । Sinnar

सिन्नर तालुक्यातील मेंढी गावात शेतात काम करत असताना वीज (lightning) पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.18) सायंकाळच्या सुमारास घडली. बाळू जयराम गिते (वय 60 रा. मेंढी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

- Advertisement -

आज सकाळपासूनच ढगाळ हवामानअसल्याने पावसाची दाट शक्यता होती. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला. तालुक्यातील नांदूरशिंगोटे, दोडी, नायगाव, जायगाव, पूर्व शहा, पंचाळे, सोमठाणे, मेंढी परिसरातही अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली.

निफाड तालुक्यात गारपीट; पाहा Video

काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. मेंढी येथेही पावसाची सुरवात होताच गीते हे जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडून ते जमिनीवर कोसळले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कुटुंबीयांनी हे बघताच त्यांच्याकडे धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या