Thursday, June 18, 2026
HomeनाशिकLeopard Attack: पिंपळणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

Leopard Attack: पिंपळणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथे सकाळी 8.30 वाजता 69 वर्षीय शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले आहे. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळणारे येथील गट नंबर 355 मधील शेतात सकाळी आठ वाजेच्या सुमारास गुलाब रामभाऊ साळवे हे 69 वर्षीय शेतकरी वासरू बांधत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने मुलगा जीवन गुलाब साळवे व सुन सोनाली जीवन साळवे हे धावत आल्याने बिबट्याने तेथुन धुम ठोकली.

- Advertisement -

बारामती, राहुरीत काँग्रेस उमेदवार उतरवणार; हायकमांडकडून ग्रीन सिग्नल

बिबट्याच्या हल्ल्यांनंतर त्यांना तात्काळ तळेगाव दिंडोरी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वणी आणि दिंडोरी येथील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन याबाबतचा पंचनामा केला. यावेळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनीही रुग्णालयात जाऊन पाहणी केली. घटनास्थळी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावला असुन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. डॉक्टरांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर पिंपळणारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

कारवाई

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा...