Tuesday, November 24, 2026
Homeक्राईमCrime News : डॉक्टरांचे क्लिनिक फोडून ऐवज लांबविला

Crime News : डॉक्टरांचे क्लिनिक फोडून ऐवज लांबविला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बाळासाहेब देशपांडे रूग्णालयासमोरील मदनचंद्र आर्केड इमारतीतील डॉ. अविनाश किनगांवकर यांच्या आय क्लिनिकमध्ये घरफोडी करून चोरट्याने सुमारे 22 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सप्टेंबर 2026 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत घडल्याचा अंदाज असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अविनाश लक्ष्मीकांत किनगांवकर (वय 43, रा. आगरकरमळा, स्वीट कॉर्नरजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीचे बाळासाहेब देशपांडे रूग्णालयासमोरील मदनचंद्र आर्केड इमारतीत आय क्लिनिक आहे. सप्टेंबर महिन्यापासून 22 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने क्लिनिकमध्ये प्रवेश करून तेथील साहित्य चोरून नेले. चोरट्याने क्लिनिकमधील एसी, टेबल, तीन लाकडी बेंच, दहा प्लास्टिक खुर्च्या, इन्व्हर्टर, बॅटरी, लोखंडी खाट आणि तीन सिलिंग फॅन असा एकूण 22 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अविनाश वाकचौरे पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : पुढील आवर्तने केवळ पिण्यासाठीच – मंत्री विखे पाटील

0
राहाता |वार्ताहर| Rahata धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून आवर्तनाचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी आगामी काळ अधिक आव्हानात्मक असणार आहे. पुढील आवर्तने झालीच, तर ती...