Tuesday, April 7, 2026
Homeक्राईमCrime News : शेतकर्‍याच्या शेतातील संत्री चोरून नेणारा संशयित जेरबंद

Crime News : शेतकर्‍याच्या शेतातील संत्री चोरून नेणारा संशयित जेरबंद

सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त || तालुका पोलिसांची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दशमीगव्हाण (ता. नगर) येथील शिवारात शेतकर्‍याच्या शेतातील संत्री चोरून नेणार्‍या संशयित आरोपीस अहिल्यानगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के (रा. उक्कडगाव, ता. नगर) यांनी त्यांच्या संत्र्यांच्या शेतातील संत्री विक्रीसाठी काढण्याच्या उद्देशाने शेतात 110 रिकामे कॅरेट ठेवले होते. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 6 वाजता ते शेतात गेले असता तेथे फक्त 12 कॅरेट शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

उर्वरित 98 कॅरेट तसेच झाडांवरील संत्री गायब होती. शेतात टेम्पोच्या टायरचे ठसे दिसून आल्याने अज्ञात चोरट्यांनी संत्री चोरून नेल्याची खात्री झाली. या घटनेत अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची संत्री व 4 हजार 900 रुपये किंमतीचे कॅरेट असा एकूण 1 लाख 24 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, इरफान बाबा शेख (रा. निंबोडी, ता. नगर, सध्या मुकुंदनगर, अहिल्यानगर) याने साथीदारांसह ही चोरी केली असून तो शेंडी (ता. अहिल्यानगर) येथे संत्री विक्रीसाठी गेला आहे. या माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी इरफान शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख रुपये किंमतीचा टेम्पो, 1 लाख 16 हजार 800 रुपये किंमतीची संत्री व 3 हजार 650 रुपये किंमतीचे कॅरेट असा एकूण 3 लाख 20 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताज्या बातम्या

Shrigonda : साकळई योजनेस घोड धरणातून पाणी देण्यास विरोध

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda तालुक्यातील घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी घोड धरणातून पाणी देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावामुळे घोड...