Friday, May 3, 2024
Homeनगर21 गावांतील शेतकर्‍यांचा गुहा येथे ‘रास्तारोको’

21 गावांतील शेतकर्‍यांचा गुहा येथे ‘रास्तारोको’

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

निळवंडे कालव्याच्या कामाला गती मिळावी, यासाठी आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासह 21 गावांतील लाभधारक शेतकर्‍यांनी नगर- मनमाड महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केले. निळवंडे कालव्यांच्या कामांना तातडीने गती न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा आ.प्राजक्त तनपुरे यांनी दिला. जवळपास एक तास सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. नंतर कालवा पाटबंधारे अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

- Advertisement -

निळवंडे उजव्या कालव्याचे कामे त्वरीत पूर्ण करावीत, तांदुळनेर येथील वन विभागाच्या हद्दीतील कामे त्वरीत सुरू करावीत, कणगर वडाचे लवण येथे सुरू असलेल्या कामाला गती मिळावी. पाटचार्‍यांची कामे तात्काळ सुरू करावी यासाठी आ.प्राजक्त तनपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह निळवंडे कालवा कृती समिती व लाभधारक शेतकर्‍यांनी हे रास्तारोको आंदोलन केले होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी हे सरकार गेंड्याच्या कातड्याचे सरकार असून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बेफिकीर असून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन जन आंदोलन उभारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

आ.प्राजक्त तनपुरे यांनी निळवंडे कालव्याच्या कामाबाबत सरकारवर ताशेरे ओढून आमच्या लाभधारक शेतकर्‍यांची भावना सरकारने लक्षात घेऊन कालव्याच्या कामांना गती न दिल्यास पुन्हा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.या आंदोलनात सुजित वाबळे, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, उपाध्यक्ष दादासाहेब पवार, सोपान हिरहळ, गंगाधर गमे, किरण गव्हाणे, पप्पू माळवदे, सुखदेव बलमे, रघुनाथ मुसमाडे, बापूसाहेब कोबरणे, सुधाकर मुसमाडे, गणेश हारदे, विजय बलमे, भास्कर गाडे, भगीरथ नरोडे, दत्तात्रय बलमे, मंजबाप कोबरणे, मनोहर कोबरणे, रमेश कोबरणे, राजेंद्र कोबरणे, जयसिंग घाडगे, भारत कोबरणे, रमेश कोबरणे, विजू हारदे, नाना कोबरणे, अशोक उर्‍हे, रामा बर्डे, वेणूनाथ लांबे, निलेश ओहळ, प्रणय कोळसे, बापू हारदे, बाळकृष्ण हारदे, रामचंद्र हारदे, चोपडे, राजेंद्र सिनारे, किशोर सिनारे, डॉ. रवी गागरे, हरिभाऊ लोंढे, नानासाहेब धोंडे, मच्छिंद्र गागरे, जावेद सय्यद, भाऊसाहेब गागरे, डॉ. सुधाकर मुसमाडे, नितीन गागरे, अशोक मुसमाडे, पंडित गागरे,प्रा. वर्पे, उत्तमराव घोरपडे, विठ्ठलराव घोरपडे आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या