Wednesday, January 7, 2026
HomeनगरSangamner : शेतकर्‍याने रस्त्यावर ओतला कांदा

Sangamner : शेतकर्‍याने रस्त्यावर ओतला कांदा

प्रतिकिलो मिळाला अवघा 1 रुपया 85 पैसे भाव

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील वडगावपान येथील शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांच्या कांद्याला प्रतिकिलो फक्त 1 रुपया 85 पैसे बाजारभाव मिळाला. हा अपमान सहन न झाल्याने संतप्त होत थेट रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.

- Advertisement -

कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील वडगावपान फाटा येथे मंगळवारी (दि.11) दुपारी शेतकरी थोरात यांनी आपला संपूर्ण कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणून रस्त्यावर ओतून तीव्र आंदोलन केले. त्यांच्या या कृतीमुळे परिसरात मोठा जमाव जमला. त्यानंतर शेतकर्‍यांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाहतूकही ठप्प झाली होती. संपूर्ण रस्ता लाल कांद्याने भरून गेला, रस्त्यावर अक्षरशः कांदेच कांदे पसरले होते. यावर्षी पावसाने कांदा पीक उद्ध्वस्त केले. तरीही शेतकर्‍यांनी पुन्हा उभारी घेत पिकाला सांभाळले. पण बाजारात विक्रीसाठी गेल्यावर कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

YouTube video player

दरम्यान, काही शेतकर्‍यांनी नुकताच काढलेला कांदा विकण्याऐवजी रोटाव्हेटर फिरवून जमिनीत गाडला, कारण एवढ्या कमी भावात विकून तोटा सहन करण्यापेक्षा नष्ट करणं सोपं वाटलं. एकीकडे महागाईचा भडका आणि दुसरीकडे शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामध्ये शेतकर्‍यांचं आयुष्य अक्षरशः चिरडलं जात आहे.

ताज्या बातम्या

Pathardi : परराज्यातून गांजा विक्रीसाठी आणणारे गजाआड

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पाथर्डी पोलिसांनी मंगळवारी धडकेबाज कारवाई करत परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या टोळीतील दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल 27 लाख 41...