Thursday, May 2, 2024
Homeनगरनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने भरपाई मिळावी - आ. डॉ. तांबे

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने भरपाई मिळावी – आ. डॉ. तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

उत्तर महाराष्ट्रासह संगमनेर तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने खरिपातील सोयाबीन पिकासह अन्य पिके पूर्णपणे वाया गेली आहे. याचा मोठा आर्थिक फटका ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी बांधवांना बसला असून सरकारने सरसकट पंचनामे करून तातडीने भरीव मदत द्यावी, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील विविध शेतकर्‍यांनी आमदार डॉ. तांबे यांची पिकांच्या नुकसानी बाबत भेट घेतली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, तालुक्यात सर्वत्र जास्त पाऊस झाला आहे. यामुळे शेतात उभी असलेली पिके पाण्याने पूर्णपणे वाया गेली आहे. शासनाने फक्त घोषणाबाजी न करता तातडीने सरसकट पंचनामे करावेत व लवकरात लवकर भरीव मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी.

या मदतीसाठी कोणत्याही जाचक अटी टाकू नये. शेतकरी हा ग्रामीण भागात राहत असून ऑनलाईन पद्धती किंवा इतर नियमांचे पालन करणे त्याच्या दृष्टीने अवघड होत असते. कागदपत्रापेक्षा पंचनामे झाल्यानंतर सरसकट पद्धतीने सहज सुलभतेने शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रुपये रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी ही आमदार डॉ. तांबे यांनी सरकारकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या