Friday, March 28, 2025
Homeजळगावजिल्ह्यात सव्वालाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

जिल्ह्यात सव्वालाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

जळगाव  – 

सप्टेंबर 2019 पर्यंत प्रति शेतकरी दोन लाख रुपये कमाल मर्यादेपर्यत राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून त्यामुळे जिल्हयातील सुमारे 1लाख 24हजार 771 शेतकर्‍यांसह अन्य शेतकर्‍यांचे थकीत पीक कर्जमाफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेसह अन्य बँकांना 330000.00 लाख कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते.त्यापैकी सरासरी 15 ऑक्टोबर 2019 पयर्ंत 72796.03 लाख रुपये सरासरी 24.79 टक्के खरीप व रब्बी पिककर्ज वाटप केले असून यात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मार्च 2020 नंतर कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

याबाबत शासकीय परीपत्रक आल्यानंतरच या कर्जमाफीसंदर्भातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे जिल्ह्यातील बहुतांश बँक प्रशांसनांनी म्हटले आहे. गेल्या आठ दहा वर्षांपासून अस्मानी सुलतानी संकंटामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांना गत 2017 मधे तत्कालीन राज्य शासन काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान येाजनेेंतर्गत निकषांनुसार 1.50 लाख रूपये पीककर्ज थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली होती. यात यलो,ग्रीन अशा अकरा ते बारा याद्या जाहिर केल्या होत्या.

जेडीसीसीकडून 33.06 टक्के कर्ज 

जिल्हा मध्यवर्ती बँकेतंर्गत खरीप व रब्बी कर्जवाटपाचे 124792लाखांपैकी विकासोचे 1लाख, 03हजार,913 शेतकरी सभासदांना 35599.66,(32.06टक्के),राष्ट्रीयकृत बँकाकडून 153036लाख उद्दीष्टांपैकी 15हजार 139 शेतकर्‍यांना 23,884.21(17.54टक्के), ग्रामीण बॅक 3092लाख उद्दीष्टापैकी 776सभासदांना 973.27(35.37टक्के),खाजगी बॅक 46927पैकी 4943सभासदांना 12338.89(29.55टक्के),इतर बँका 2153उद्दीष्टांपैकी शुन्य टक्के असे एकुण 330000 रकमेचे 1लाख,24हजार, 771सभासद शेतकर्‍यांना 72796.03 रकमेचे 15 आक्टोबर 2019 अखेर खरीप व रब्बी पिककर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतकरी पात्र

ा गत योजनेत दिड लाखांचे वर अनेक शेतकरी थकबाकीमुळे या कर्जमाफी योजनेपासून वंचीत राहिले होते. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतंर्गत सन 2015 पासून दोन लाख रूपये मर्यादेपर्यत पीककर्ज थकबाकीदार शेतकर्‍यांना लाभ मिळण्यास पात्र ठरले असल्याचे म्हटले आहे. तर 15 ऑक्टोबर 2019 पर्यत खरीप व रब्बी पिककर्ज घेतलेल्या सव्वा लाख शेतकर्‍यांना देखिल या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...