Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशसंसदेला घेराव घालण्याचा शेतकर्‍यांचा इशारा

संसदेला घेराव घालण्याचा शेतकर्‍यांचा इशारा

नवी दिल्ली / New Delhi – नवे कृषी कायदे (new agricultural laws) रद्द करावेत या मागणीसाठी शेतकर्‍यांचे अनेक महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. आता आंदोलन करणार्‍या संयुक्त किसान मोर्चाने (Samyukt Kisan Morcha (SKM)) 22 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. रोज 200 शेतकर्‍यांचा एक गट आंदोलन करेल.

तसंच विरोधकांनी संसेदत आमच्याबाजूने आवाज उठवावा किंवा राजीनामा द्यावा, विरोधकांनाही सुनावलं आहे. याआधी 8 जुलैला पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीवर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या