Sunday, September 15, 2024
Homeनाशिकबाप मुलीच्या नात्यास काळीमा, निफाड तालुक्यातील घटना

बाप मुलीच्या नात्यास काळीमा, निफाड तालुक्यातील घटना

निफाड । Niphad

- Advertisement -

स्वत: च्या 16 वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेवून जात वारंवार बलात्कार (Rape) करुन गरोदर केल्याच्या आरोपात पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील नराधाम पित्यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे (Niphad Additional District Court) न्यायाधीश पी.डी. दिग्रसकर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासाची (Life imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

मुलीस मासिक पाळी आली नाही म्हणून तिचे आईने वैद्यकिय उपचारासाठी डॉक्टरांकडे नेल्यावर पिडित मुलगी गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पिडितेस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी पिडितेने सावत्र बापाने क्रूरकर्म केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून सायखेडा पोलिसात भादवि कलम 376 (2) एफ.एन.506, बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4,6 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येवून नराधाम पित्यास अटक करण्यात आली होती.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल रामनाथ शिंदे यांनी तपास अधिकारी पो.नि. अंबादास मोरे, रामचंद्र कर्पे, डीएनए अहवाल तपासणी करणार्‍या डॉ.वैशाली महाजन यांचेसह 16 महत्वपूर्ण साक्षदारांची साक्ष नोंदविली.

न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी पित्याने 16 वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब सिद्ध झाल्याने आरोपी नराधम पित्यास न्यायालयाने दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास व 10 हजार रु. दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या