Friday, May 3, 2024
Homeनगरचाकुचा धाक दाखवत वृद्धास दिवसा ढवळया लुटले

चाकुचा धाक दाखवत वृद्धास दिवसा ढवळया लुटले

पिंपरी निर्मळ । वार्ताहर

राहाता (Rahata) तालुक्यातील पिंपरी निर्मळ-लोणी रोडवर (Pimpari Nirmal-Loni road) निळवंडे कालव्याजवळ चाकुचा धाक दाखवुन दुचाकी स्वारांनी वृद्धास पाच हजारांना लुटले आहे. दिवसा ढवळया घडलेल्या या प्रकारामुळे परीसरात भितीचे वातावरण आहे.

- Advertisement -

अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

पिंपरी निर्मळ येथील वयोवृध्द शेतकरी सर्जेराव दादा घोरपडे हे आपल्या लोणी येथील शेतावरून पिंपरी निर्मळकडे दुचाकीवर येत होते. पिंपरी निर्मळ लोणी रोडवरील निळवंडे कालव्यांच्या जवळ लोणी कडील बाजुला मोठया प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढलेली आहेत. या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोघानी घोरपडे यांना गाडी आडवी लावत चाकुचा धाक दाखविला व खिशातील पाच हजार घेवुन पोबारा केला.

गोल्डन ड्रेसमध्ये ‘हिना खान’चा जलवा, पाहा ग्लॅमरस फोटो

या रस्त्यावर शेजारीच वरद विनायक सेवाधाम असल्याने कायमच वर्दळ असते. मात्र तरीही अशा ठिकाणी दिवसा ढवळ्या चाकु दाखवुन लुटण्याचा प्रकार घडल्याने परीसरात भितीचे वातावरण आहे. लोणी पोलिसांनी याबाबीमध्ये लक्ष घालावे अशी मागणी नागरीक व प्रवासांमधून होत आहे.

Cannes Film Festival मध्ये बॉलीवूड अभिनेत्रींचा जलवा; पहा खास PHOTO

- Advertisment -

ताज्या बातम्या