Sunday, June 21, 2026
Homeक्राईमप्राध्यापक महिलेसोबत गैरकृत्य करून केली मारहाण

प्राध्यापक महिलेसोबत गैरकृत्य करून केली मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

फटाके वाजवू नका असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी प्राध्यापक महिलेला मारहाण करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना बुधवारी (6 नोव्हेंबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास शहरात घडली. पीडित प्राध्यापक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

लक्ष्मण सारसर, युवराज सारसर, हर्षल सारसर (सर्व रा. म्युन्सिपल कॉलनी, नालेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपी यांनी बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविले. फिर्यादी त्यांना फटाके वाजवू नका असे म्हणाल्या असता त्यांना राग आला. त्या रागातून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लक्ष्मण सारसर याने धक्काबुक्की करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या भावाला देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

‘तुम्ही येथे राहु नका, मी येथेच फटाके वाजवेल, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दुसरीकडे जावून रहा, मला कोणी काहीएक करू शकत नाही’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, त्या तिघांनी तेथून जाताना दोन तरुणांना लाकडी दांडके व लोखंडी गजाने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

उद्या पासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन; लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (२२ जून) प्रारंभ होत असून हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...