Friday, November 27, 2026
Homeक्राईमCrime News : विद्यार्थिनीचा विनयभंग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी

Crime News : विद्यार्थिनीचा विनयभंग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी

गुण जास्त देण्याचे आमिष || शिक्षकाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अल्पवयीन विद्यार्थिनीशी फोनवर अश्लील संभाषण करून तिचे आक्षेपार्ह फोटो मिळविणे, तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला अधिक गुण देण्याचे आणि परदेशात डॉक्टर बनण्यासाठी पाठविण्याचे आमिष दाखविले. तसेच बोलण्यास नकार दिल्यास परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गजानन सोनवणे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नामक शिक्षकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मुळे कर्जत तालुक्यातील व सध्या सावेडी उपनगरात राहणार्‍या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या (वय 15) आईने (वय 46) बुधवारी (25 नोव्हेंबर) पोलिसांत फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी कर्जत येथील एका शाळेत शिक्षण घेत असताना संबंधित शिक्षकाने तिच्या आजीच्या मोबाईलवर फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फोनवर अश्लील संभाषण करून तिचे आक्षेपार्ह फोटो मिळविले. तसेच माझ्याशी नियमित बोलत जा, तुला परीक्षेत जास्त गुण देऊन परदेशात डॉक्टर बनण्यासाठी पाठवतो, असे आमिष दाखविले. मात्र, विद्यार्थिनीने बोलण्यास नकार दिल्यास पेपर तपासताना नापास करीन आणि तुला डॉक्टर होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.

एवढेच नव्हे, तर फोटो पाठविले नाहीस तर तुझ्या आई-वडिलांना ठार मारीन, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित शिक्षकाने व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून विद्यार्थिनीला आक्षेपार्ह फोटो पाठविण्यास भाग पाडले. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तिचा पाठलाग करून अश्लील संदेश पाठविले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

अपेक्षांच्या विळख्यात अडकली तरुणाईची लग्नगाठ!

0
आश्वी | Ashwi सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात तरुणांच्या विवाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनला आहे. विवाहाचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही लाखो...