Friday, November 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसंसदेचे विशेष अधिवेशन : ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे, २ डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज

संसदेचे विशेष अधिवेशन : ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे, २ डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज

महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याचे संकेत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी केली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. त्यानुसार लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज परिस्थितीनुसार ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक पुन्हा मांडले जाण्याचे संकेत मिळत आहेत.

The Government has requested Hon’ble Speaker, Lok Sabha and Hon’ble Chairman, Rajya Sabha to reconvene Lok Sabha on Monday, 30th November, 2026 and Rajya Sabha on Wednesday, 2nd December, 2026 respectively to transact essential Government Business. Subject to exigencies of the Business, the sitting of both Houses may conclude on 3rd December, 2026.— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 26, 2026

- Advertisement -

विशेष अधिवेशनासाठी संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप औपचारिकरीत्या संस्थगित करण्यात आलेले नाही, ही बाब महत्त्वाची ठरली आहे. १३ ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रपतींकडून अधिवेशनाचे औपचारिक सत्रावसान करण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यमान अधिवेशन पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेच्या इतिहासातील हा सर्वाधिक काळाचा अनौपचारिक खंड ठरल्याचे वृत्त आहे.

महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शयता आहे. या विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडलेली आहे. यापूर्वी या विधेयकाला संसदेत आवश्यक पाठिंबा मिळाला नव्हता. त्यामुळे आता सरकार नव्याने कोणती भूमिका मांडते आणि विरोधकांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधकांवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर टीका केली आहे. एका लेखातून त्यांनी यापूर्वी विधेयक मंजूर न झाल्याबद्दल एका विरोधी पक्षाला जबाबदार धरले. महिलांना पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत देशातील महिलांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

गावठी कट्ट्यातून गोळीबार; एक जण गंभीर जखमी, संशयित फरार

0
नैताळे | वार्ताहर Naitale राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच निफाड तालुक्यातील नैताळे येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. गावाला पाणीपुरवठा...