Thursday, November 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजस्फोटक पदार्थाचा अवैध साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्फोटक पदार्थाचा अवैध साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

​ओझे l वार्ताहर Oze

- Advertisement -

कसबे वणीतील जगदंबा नगर मध्ये एका पत्र्याच्या शेड मध्ये अवैध स्फोटक पदार्थांचा साठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली मानवी जीवितास व सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने, कोणताही अधिकृत शासकीय परवाना नसताना बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थांचा साठा बाळगल्याप्रकरणी वणी पोलिसांनी धडक कारवाई करत ७ हजार रुपये किमतीचा स्फोटक साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, कसबे वणी येथील जगदंबानगर भागातील दिपक संजय सुरासे (वय ३२) याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटक पदार्थांचा बेकायदेशीर साठा लपवून ठेवल्याची माहिती सहा.पोलिस निरीक्षक हेमंत फड यांना मिळाली होती. त्यांनी पो.हवा. मुज्जम्मील देशमुख कुणाल मराठे व आंबादास जाडर यांच्या सह दि.२५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत ३ हजार रुपये किमतीच्या २०० पांढऱ्या रंगाच्या जिलेटीन कांड्या (खाकी बॉक्समध्ये, ज्यावर ‘Super Power 90X, Solar Explochem Ltd.’ असे कंपनीचे नाव आहे), ३ हजार ५०० रुपये किमतीची पांढऱ्या रोलमध्ये गुंडाळलेली लाल रंगाची ‘DEF Corex’ वायर आणि ५०० रुपये किमतीची लाकडी खोक्यात असलेली डिटोनेटर बॅटरी असा एकूण ७ हजार रुपये किमतीचा स्फोटक साठा हस्तगत करण्यात आला.

​सदर आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणतेही स्फोटक पदार्थ हाताळण्याचे प्रमाणपत्र व अधिकृत परवाना नसताना हा साठा जवळ बाळगला होता. तसेच, दिपक सुरासे याच्याकडे कोणताही शासकीय परवाना नसतानाही ओझरमिग (ता. निफाड) येथील संदिप अक्कर याने त्याला हे स्फोटक पदार्थ पुरवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​याप्रकरणी वणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुज्जम्मील देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी दिपक संजय सुरासे वय -३२(रा. जगदंबानगर, कसबे वणी, ता. दिंडोरी) आणि संदिप अक्कर (रा. ओझरमिग, ता. निफाड) या दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दिपक सुराशे याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Crime : घरात घुसून दाखवला चाकूचा धाक; रोख रकमेसह सोने केले...

0
येवला | प्रतिनिधी Yeola शहरातील मिल्लतनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत...