Monday, May 20, 2024
Homeधुळेसाक्री भाजपा पदाधिकार्‍यांमध्ये हाणामारी, परस्पर विरोधी तक्रारी

साक्री भाजपा पदाधिकार्‍यांमध्ये हाणामारी, परस्पर विरोधी तक्रारी

साक्री । Sakri । प्रतिनिधी

शहरातील शासकीय विश्रामगृह (Government Rest House) येथे भाजपा पदाधिकार्‍यांमध्ये (BJP office bearers) झालेल्या हाणामारीच्या (fighting) घटनेत परस्परविरोधी तक्रार (Conflicting complaints) दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

भाजपचे सरचिटणीस (BJP general secretary) शैलेंद्र आजगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार हर्षवर्धन दहिते, सनी अकलाडे, प्रवीण देवरे, रमेश सरक मुन्ना देवरे, कुंदन देवरेसह आठ जणांविरुध्द विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

तर अजगे यांच्या विरोधात जि.प.सदस्य विजय ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवार दि.22 रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास भाजपा पदवीधर आमदार पदासाठी (post of BJP graduate MLA) इच्छुक उमेदवाराकडून शासकीय विश्रामगृहात बैठक (Meeting) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर विजय ठाकरे हे विश्राम गृहाबाहेर आले. तेव्हा आवारातच शैलेंद्र आजगे याने त्यांना दमदाटी केली. तुम्हाला सत्तेचा माज आला आहे, मी सत्ता आणली आणि तुम्ही मिरवून राहिले. भाडणे गटात तुला जिल्हा परिषदेची उमेदवारी याच बापाने मिळवून दिली आणि निवडुन आणले, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या