नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
पैसे देण्याघेण्याच्या वादातून एका व्यक्तीस मारहाण व मानसिक छळ करून त्रास दिला म्हणून संबंधित व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचा प्रकार जेलरोड (Jailroad) येथील दसक परिसरात घडला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे…
याबाबत लता विष्णू कदम (Lata Kadam) (रा. दसक, जेलरोड, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashikroad Police Station) तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, धनंजय निमसे (Dhananjay Nimse), अक्षय वाबळे (Akshay Wable), आकाश वाजे (Akash Waje), संपत बोराडे (Sampat Borade), वैभव बोराडे (Vaibhav Borade) (सर्व रा. जेलरोड) यांनी पैशाच्या व्यवहारावरून गोकुळ कदम यास बेदम मारहाण करून मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून गोकुळ याने घरी छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.