Friday, May 3, 2024
HomeUncategorizedपगाराचे पैसे न देणाऱ्या पतीला भोसकले ; पत्नीला अटक

पगाराचे पैसे न देणाऱ्या पतीला भोसकले ; पत्नीला अटक

औरंगाबाद – aurangabad

पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा, असे म्हणत (bank) बँकेत काम करणाऱ्या पतीच्या पोटावर पत्नीने चाकूने वार केला. शेख निजामोद्दीन इस्माईल (२८) असे जखमी पतीचे नाव असून त्याच्या तक्रारीवरून शहरातील सातारा (police) पोलीस ठाण्यात पत्नी विरोधात (Filed a crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

निजामोद्दीन हे बँकेत नोकरीला आहेत. दरम्यान मंगळवारी त्यांच्या पत्नीने आपण वेगळे राहु व तुम्ही तुमच्या पगाराचे सर्व पैसे माझ्याकडे देत जा असा हट्ट धरला. यावेळी निजामोद्दीन यांनी आई एकटीच असते तिच्या सोबतच आपण राहु आणि पगाराचे पैसे मी आईकडे देतो तुला लागले तर त्यांच्याकडून घेत जा असे म्हणाले.

यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि निजामोद्दीन यांच्या पत्नीने किचनमधील भाजी चिरण्याचा चाकूने हल्ला केला. मात्र त्यांनी स्वता:च बचाव केल्याने पोटाला किंचीत चाकू लागून ते जखमी झाले.

पत्नीकडून नेहमीच वाद घातला जात असल्याने आणि चाकू हल्ला केल्याने निजामोद्दीन यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी त्यांना मेडीकल मेमो देऊन घाटी दवाखाना येथे उपचारासाठी पाठविले त्यानंतर घाटीतील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. उपचारानंतर निजामोद्दीन यांच्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या