Sunday, May 5, 2024
Homeजळगावकिचन ट्रॉली बनवून न देता केली महिलेची ८० हजारात फसवणूक

किचन ट्रॉली बनवून न देता केली महिलेची ८० हजारात फसवणूक

जळगाव -jalgaon

पैसे घेतले मात्र किचन ट्रॉली बनवून न देता अयोध्यानगरातील फर्निचर कारागिराने खंडेराव नगरातील महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातील खंडेराव नगरात कलाबाई नारायण शिरसाठ (वय ४०) हे वास्तव्यास आहेत. कलाबाई यांना घरात किचन ट्रॉली तयार करायची होती. त्यासाठी त्यांनी जितेंद्र सुरेश भावसार (रा. अयोध्यानगर) याला ८० हजार रुपये दिले आहेत. १६ जूलै २०२१ रोजी भावसार याने ८० हजार रुपये घेतले. तीन महिले उलटले तरी त्याने प्रत्यक्ष कामास सुरूवात केली नाही. कलाबाई यांनी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने भुलथापा देत वेळ मारुन नेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर कलाबाई यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भावसार याच्या विरुद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या