Thursday, May 2, 2024
Homeनगरअकोले नगरपंचायतच्या उर्वरित जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल

अकोले नगरपंचायतच्या उर्वरित जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल

अकोले | प्रतिनिधी

अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीतील उर्वरित चार प्रभागातील भाजपचे उमेदवारी अर्ज माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या तर राष्ट्रवादी ,शिवसेना युतीचे अर्ज आ.डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करत आज दाखल करण्यात आले. याशिवाय काँग्रेसच्या वतीनेही ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल केले.

- Advertisement -

अकोले नगरपंचायतच्या 17 प्रभागापैकी 13 प्रभागाची निवडणूक झाल्यानंतर राहिलेल्या प्रभाग क्रमांक 4,11,13 व 14 अशा 4 प्रभागाची निवडणूक येत्या 18 जानेवारी 2022 रोजी होत असल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवट दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतिने या चार प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मा.आ.वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शक्ति प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी आर.पी.आय नेते विजयराव वाकचाैरे, चंद्रकांत सरोदे, माजी नगराध्यक्ष ॲड.के.डी धुमाळ,भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जि.प.सदस्य कैलासराव वाकचाैरे, ॲड.वसंतराव मनकर, रमेशराव धुमाळ, सुधाकरराव देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, डॅा.रवींद्र गोर्डे, दिलीप शहा, अशोक भळगट,गोरक्ष मालुंजकर, चेतन नाईकवाडी, भाजपा शहराध्यक्ष सचिन शेटे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष राहुल देशमुख, शंभू नेहे, परशराम शेळके, बबलु धुमाळ, हिम्मत मोहिते, धनंजय संत, नितीन जोशी, कीर्ती गायकवाड, हैदर पठान, हुसेन मन्सुरी, सह भाजपा कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी भाजपाने पिचड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयापासून उमेदवार व कार्यकर्ते यांनी विविध घोषणा देत तर आ. डॉ. लहामटे,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयापासून तहसिल कार्यालयापर्यंत मिरवणुकीने येत निवडणूक निर्णय आधिकारी तथा रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांचेकडे आपल्या पक्षातील चार उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

काँग्रेसने ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष, युवा नेते विक्रम नवले, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव नेहे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ म्हणाले कि, अकोले नगरपंचायत निवडणूकीत भाजपाची सत्ता येणार असुन मागील 12 प्रभागातील निवडणुकीत मतदारांनी भजपाला पसंती दिली आहे. तसाच काैल या चार प्रभागात भाजपाला अकोले शहरातील मतदार देतील व माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ.वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली भाजपाचा झेंडा अकोले नगरपंचायतीवर फडकविणार असल्याचा दावा केला.

तर ज्येष्ठ नेते ॲड वसंतराव मनकर म्हणाले कि- भाजपाकडे प्रत्येक वार्डात चार पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहे. यावरून शहरातील जनतेचा भाजपावरचा मोठा विश्वास दिसत आहे. उलट इतर पक्षांना उमेदवार मिळत नाही हीच भाजपाच्या विजयाची सुरुवात आहे .

तर आ डॉ किरण लहामटे,राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ यांनी यापूर्वी झालेल्या अकोले नगरपंचायत निवडणूकीत व होणाऱ्या निवडणूकीत मतदार राष्ट्रवादी-सेना युतीच्या उमेदवाराणां कौल देतील व नगरपंचायत वर राष्ट्रवादी-शिवसेना युतीचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी अकोले नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसने लढविलेल्या व आगामी होत असलेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या