Thursday, May 2, 2024
Homeनगरकेंद्रप्रमुख पदे भरणे विचाराधीन

केंद्रप्रमुख पदे भरणे विचाराधीन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निम्म्यापेक्षा जास्त केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. ही पदे प्रभारी न ठेवता शिक्षकांमधून ती भरली जावीत, अशी मागणी शिक्षक समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचेकडे केली. यावर शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची 30 टक्के पदे भरण्याविषयी सकारात्मक विचार करू असे आश्‍वासन क्षीरसागर यांनी दिले.

- Advertisement -

शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधीकारी यांची स्वतंत्रपणे भेट घेवून चर्चा केली. डॉ. संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, गुरुकुलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, नितिन काकडे, सूर्यभान काळे, सीताराम सावंत, भास्कर नरसाळे, संजय नळे, इमाम सय्यद, राजेंद्र पट्टेकर, वृषाली कडलग, मिनाक्षी काकडे, सुखदेव मोहिते, विजय महामुनी, गजानन जाधव, सुभाष धामणे, मधुकर मैड, दत्ता जाधव, कैलास ठाणगे, बाबासाहेब धामणे आदींचा समावेश होता. वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, मुख्याध्यापक पदोन्नती करावी, कोरोंनामुळे अनेक शिक्षक अडचणीत आल्याने मेडिकल बिले व भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा करावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. आधी विस्तारधिकारी व नंतर मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच राबविली जाईल, असे शिक्षणाधीकारी शिवाजी शिंदे यांनी संगितले.

महत्त्वाची व्हीसी सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी शिक्षकांचे प्रश्‍नांसाठी वेळ दिला. शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनीही शिक्षकांचे पदवीधर पदावनतीसारखे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले. दोन्ही अधिकार्‍यांची काम करण्याची पद्धत अतिशय आश्‍वासक असल्याने शिक्षकांना प्रशासनाकडून मोठा दिलासा मिळत असल्याचे डॉ.कळमकर, औटी व धामणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या