Friday, May 3, 2024
Homeजळगावअखेर आशादीप वसतिगृह बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल

अखेर आशादीप वसतिगृह बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव – Jalgaon

गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी जिल्ह्यासह राज्यात आशादीप वसतिगृहात पिडीत मुलींना नाचविण्याचा आरोप झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. विधानसभेच्या पटलावरही या विषयावर सत्ताधार्‍यांसह विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

- Advertisement -

याप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार वसतिगृहात असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे समोर आले. आशादीप वसतीगृहासह येथील पिडीत मुलींची बदनामी झाल्याचे समोर आल्यानंतर आज मंगळवारी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आशादीप वसतिगृहातील प्रकरणाबाबत कुठलीही शहानिशा न करता वृत्त प्रकाशित करणारे वृत्तपत्र, वृत्त प्रसारित करणारे समाज माध्यमांसह, चॅनेल, तसेच व्हिडीओ तयार करणारे तरुण, बदनामीस कारणीभूत तक्रार देणारे सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांचा यात समावेश असून चौकशीत संबंधितांची नावे निष्पन्न करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

वसतीगृहाच्या बदनामीबरोबरच संबंधित वृत्तामुळे पिडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मागर्र्दर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रामकृष्ण पवार व कर्मचारी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या