Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

ठाणे | Thane

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो या यात्रे दरम्यान वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणा आता ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंगरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम कलम 500, 501 अन्वये अदखलपात्र (नॉन-कॉग्निझेबल- NCR)) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

“सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण त्यांनी कोणताही माफीनामा लिहिला नाही. सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एक प्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. “मी तुमचा नोकर राहू इच्छितो”, असे सावरकर यांनी पत्रात म्हटल्याचेही राहुल गांधी यांनी अधोरेखित केले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे मनसेही राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची सभा शेगावला होणार आहे, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शेगावला जाण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या