Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारभगदरी येथे शेतातील धान्याला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

भगदरी येथे शेतातील धान्याला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

मोलगी | वार्ताहर- MOLAGI

अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील भगदरी येथील शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील कापलेले पिक शेतातील खळयात रचून ठेवले होते. मात्र, दुपारच्या वेळी अचानक आग (fire) लागून हे सर्व धान्य जळून खाक झाले आहेत. त्यामुळे पाच ते सहा शेतकर्‍यांचे (farmer) लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

Video सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

भगदरी गावांतील डोंगरफळी येथील प्रताप वसावे, गोवा वसावे, भरत वसावे, ओंमदया वसावे यांनी आपला खरीप हंगामातील पीक हे आपल्या गावातील शेतातच खळे करून रचून ठेवले होते.

मात्र, तीन वाजेच्या सुमारास अचानक आपल्या खळ्यातील पिकाला आग लागल्याचे समजताच ते त्या ठिकाणी पोहचले. पण तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. या शेतकर्‍यांचे खळ्यातील पीक हे मोर, बंटी, सोयाबीन आणि भात होते.

त्यामुळे या शेतकर्‍यांचे मागील हंगामातील हाताशी आलेले उत्पन्न पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला पण आग पूर्ण लागल्याने ती विझवता आली नाही.

भगदरी गावांतील या घटनेने शेतकरी वर्गाला मोठा धक्का बसला आहे. वर्षभर राबराब राबणार्‍या शेतकरी राजाचे उत्पन्न काही मिनिटांतच जळून खाक झाल्याने या चार ते पाच कुटुंबातील व्यक्तीला खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे गावांतील शेतकरी बांधवांनी त्यांना आधार देणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या