पाल, ता. रावेर (वार्ताहर)- दि. 05 मे रोजी पालपासून काही अंतरावरील जमन्या वनपरिक्षेत्रात 35 ते 40 अतिक्रमण धारकांकडुन घुसखोरी करत वनविभागाच्या ताफ्यावर अचानकपणे गोळीबार करण्यात आला. या शिकारींकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सुदैवाने वनाधिकारी व कर्मचारी बचावले.
सविस्तर असे की सोमवार रोजी जमन्या वनपरिक्षेत्रांची शेंनपाणी नाल्याजवळ 128 न कुटी वर वनक्षेत्रपाल अक्षय मैत्रे व त्यांचे नऊ वनकर्मचारी नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना अचानक वनविभागाच्या ताफ्यावर काही बंदूकधारी गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला. काही वेळ धावपळ निर्माण झाली. या अचानक झालेल्या गोळीबाराचे लक्ष्यात येताच वनविभागातर्फे हवेत गोळीबार करण्यात आला. हवेत गोळीबार करताच हल्लेखोर मध्यप्रदेश राज्यकडे पसार झाले. वनकर्मचारिंनीही न घाबरता त्यांचा पाठलाग केला परंतु अपूर्ण कर्मचारी स्टॉप असल्याने हल्लेखोरांना रोखता आले नाही.
लंगडा आबा जंगलात वनाधिकारींच्या ताफ्यावर अतिक्रमण धारकाकडून गोळीबार
ताज्या बातम्या
श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी
श्रीरामपूर | प्रतिनिधी
शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...




