Thursday, May 21, 2026
HomeनगरAhilyanagar : आज निकाल; पालकांना दाखवाव्या लागणार उत्तरपत्रिका

Ahilyanagar : आज निकाल; पालकांना दाखवाव्या लागणार उत्तरपत्रिका

शिक्षकांची डोकेदुखी वाढली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्यापूर्वी आज 1 मे रोजी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. निकालावेळी यंदा पहिल्यांदाच शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तरपत्रिका दाखवाव्या लागणार आहेत. तसे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी काढले आहेत. शिक्षकांना आता प्रत्येक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अचूक तपासावी लागणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास व अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रात चालना देण्यासाठी राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी निकालपत्र देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवायच्या आहेत.

उत्तरपत्रिका दाखविल्याने विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्यांचे अचूक निदान करता येणार आहे. विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच वैयक्तिक पातळीवर उपारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम राबविता येतील. गुणांपेक्षा कौशल्य व समज यावर आधारित प्रगतीचे मोजमाप शक्य होईल, हा त्यामागील उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांचीही मदत
विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील. अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पालक पार पाडतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी (अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन) विकसीत करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील. शाळा-घर या दोन्ही स्तरावर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. शिक्षक-पालकात सतत संवाद होईल. त्याअनुषंगाने विद्यार्थ्याच्या विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो, असे शिक्षण आयुक्तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येईल. आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते आणि शैक्षणिक तसेच वर्णनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रीय होईल. या उद्देशानेचनिकालावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवायच्या आहेत.
भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

ताज्या बातम्या

कॉकरोच

Cockroach Janata Party: सोशल मीडियावर सुपरहीट झालेल्या ‘कॉकरोच पार्टी’ला मोठा झटका;...

0
मुंबई | Mumbaiसरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाल्यानंतर सुरू झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने संपुर्ण देशात खळबळ माजवली आहे. या पार्टीची सोशल मिडियावर जोरदार...