Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले पाच पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले पाच पॉझिटिव्ह रुग्ण

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९० वर

जळगाव – 

जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या ४६ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाले. यापैकी ४१ व्यक्तींचे  अहवाल निगेटिव्ह आले असून  पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये भुसावळ येथील एक ६० वर्षीय पुरुष, कांचननगर, जळगाव येथील ३५ वर्षीय महिला, तर पाचोरा येथील ४४ व ५३ वर्षीय पुरुष व २० वर्षीय महिला अशा तीन आणि एकूण पाच रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पाचोरा येथील १९ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९० इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...